परिवहन मंत्री अनिल परब आणि ‘आर्टीओ’मधील वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

नाशिक – परिवहन मंत्री अनिल परब आणि ‘आर्टीओ’मधील वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. निलंबित आर्टीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘आर्टीओ विभागात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारांत भ्रष्टाचार होतो’, असा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. अधिकार्‍यांच्या साहाय्याने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी चालू आहे. पाच दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. गजेंद्र पाटील चौकशीसाठी उपस्थित झालेले नाहीत. ते ३१ मे नंतर उपस्थित रहाणार असल्याचे समजते.