‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र’च्या वतीने गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नदान !

गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नदान करतांना ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र’चे मावळे

सातारा, २९ मे (वार्ता.) – ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’चे संस्थापक अध्यक्ष प्राणजितभाऊ गवंडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

या वेळी ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’चे पश्‍चिम महाराष्ट्र्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष विशाल साबळे, करमाळ्याचे युवा सेना उपशहराध्यक्ष अविनाश भिसे, प्रसाद निंबाळकर, पश्‍चिम महाराष्ट्र सामाजिक संकेतस्थळाचे अध्यक्ष विनोद इंदलकर, अक्षय चिवट, शुभम् झोळे, गणेश कांबळे, अतुल लष्कर, सूरज साठे आणि मावळे सहभागी झाले होते.

श्रीराम प्रतिष्ठानच्या सहकार्याने अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून हे अन्नदान करण्यात आले. ‘छत्रपती शासन ग्रुप’च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. कोरोनाकाळात रक्तदान शिबिरे, गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नधान्याचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यांचे वाटप, नागरिकांना आरोग्यविषयी आवश्यक साहित्याचे वाटप आदी उपक्रम आतापर्यंत ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.