
सांगली, २६ मे (वार्ता.) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हे शिबिर २८ मे या दिवशी शासकीय रुग्णालयाजवळ असलेल्या डॉ. शिरगावकर रक्तपेढी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. तरी अधिकाधिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश ठाणेदार यांनी केले आहे.
गर्दी टाळण्यासाठी श्री. मंगेश ठाणेदार – ९८८१२०७००८, श्री. शुभम् कुलकर्णी – ९४०५५५६१०३, श्री. विश्वनाथ कानिटकर – ८२७५२७१६५५ या क्रमांकावर नोंदणी करून रक्तदानासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !