अमरावती येथे अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती यांनिमित्ताने रक्तदान शिबिर अन् ‘प्लाझ्मा डोनेशन कॅम्प’ यांचे आयोजन !

अमरावती – येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ अंतर्गत परशुराम शोभा यात्रा उत्सव समिती २०२१ द्वारे आयोजित परशुराम जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय सुमित शर्मा (बालाजी) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिर अन् प्लाझ्मा डोनेशन कॅम्प यांचे पी.डी.एम्.सी. ब्लड बँक आणि लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण भारतात रक्तदात्यांची नगरी म्हणून ओळख असणार्‍या अमरावतीत कोरोनाच्या रुग्णांसाठी आतापर्यंत ३५० प्लाझ्मा बॅग उपलब्ध झाल्या होत्या.

या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि परशुराम उत्सव समिती यांच्या द्वारे भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिर घेऊन प्लाझ्मा संकलन करण्यात आले. या वेळी परशुराम जयंती उत्सव समितीचे संयोजक श्याम कालिदास शर्मा, मनीष चोबे, रमेश उपाख्य पप्पू छागाणी, गणेश शर्मा, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.