सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ५०० जणांचा मृत्यू

१. २४ घंट्यांतील नवीन रुग्ण ८०, तर १३ जणांचा मृत्यू

२. उपचार चालू असलेले रुग्ण ,५ सहस्र ४५४

३. बरे झालेले एकूण रुग्ण ,१४ सहस्र २७२

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ,२० सहस्र २३२

५. अतीदक्षता विभागातील रुग्ण ३५०

जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेशासाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रसार आणि प्रभाव पहाता जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेशासाठी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत यांना कोरोनाविषयीची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. १७ मेपासून जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रशासनाच्या वतीने ही चाचणी करण्यात येत आहे. तरी सर्वांनी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.