जेथे मुसलमान बहुसंख्येने असतात, तेथे ते एकमेकांना ठार करतात, तर जेथे अल्पसंख्य असतात, तेथे ते बहुसंख्यांकांवर आक्रमणे करतात ! एकूणच ‘इस्लाम’ म्हणजे ‘शांतता’ असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात जगभरातील वस्तूस्थिती अगदी वेगळी आहे, हे लक्षात येते !
काबूल (अफगाणिस्तान) – येथील शांकर दारा जिल्ह्यातील एका मशिदीमध्ये ईदच्या दिवशी नमाजाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात १२ जण ठार झाले. यात मशिदीच्या इमामचाही समावेश आहे. यात १५ जण घायाळही झाले. काही दिवसांपूर्वीच तालिबानने शस्त्रसंधी घोषित केली होती; मात्र त्याचे उल्लंघन करून हा स्फोट घडवण्यात आला.
Bomb explodes in Kabul mosque, at least 4 killed: official https://t.co/X1hWa3JxvN pic.twitter.com/HzRryKNYZ4
— CTV News (@CTVNews) June 12, 2020
१३ मेपासून तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात चर्चा चालू झाली असतांनाच हा बॉम्बस्फोट झाला. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील त्याचे उर्वरित २ सहस्र ५०० सैन्य माघारी घेण्याचे घोषित केल्यानंतर आतंकवादी आक्रमणामध्ये वाढ झाली आहे.