अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर खाते बंद !

नवी देहली – अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर खाते ट्विटरकडून बंद करण्यात आले आहे. यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

बंगालमध्ये निवडणुकानंतर झालेल्या हिंसाचाराच्या बातम्यांविषयी कंगना यांनी ‘बंगाल व्हॉयलेन्स’ या हॅशटॅगसह ‘ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण आहे’, असे ट्वीट केले होते. यावरून त्यांचे खाते बंद केल्याचे समजते.