श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. महर्षींनी साधकांना श्रद्धा वाढवायला सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘विविध त्रास होत असतांनाहीसाधक साधना करतच आहेत, अजून किती करणे अपेक्षित आहे ?’, असा प्रतिप्रश्न विचारणे

​ ‘एकदा एका नाडीपट्टीवाचनामध्ये  महर्षींनी साधकांना उद्देशून सांगितले, ‘‘साधकांची देवावरील श्रद्धा अजूनवाढायला हवी.’’ यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘या आपत्काळातही तीव्र त्रासांमध्ये माझे साधक साधना करत आहेत. कुणाला शारीरिक, कुणाला मानसिक, तर कुणाला आध्यात्मिक त्रास होत आहेत. माझ्या साधकांना चोहोबाजूंनी त्रासांनीग्रासले असतांनाही ते चिकाटीने साधना करत आहेत; म्हणून त्यांना असह्य अशा समष्टी त्रासांनाही सामोरे जावे लागत आहे. साधक त्रासाला आनंदाने सामोरे जातही आहेत. साधक त्यांच्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. ‘कलियुगामध्ये अशापरिस्थितीत साधनेत टिकून रहाणे’, हे अत्यंत कठीण असतांना साधक साधनेचे हे शिवधनुष्य पेलत आहेत. ही त्यांचीदेवावरील दृढ श्रद्धाच नव्हे का ? अजून माझ्या साधकांनी काय करायला हवे ?’, असे प्रश्न महर्षींना विचारण्यास सांगितलेहोते.

२. यावर महर्षींनी ‘साधकांनी आपत्काळात साधनेत समाधान न मानता अखंड सावधान रहायला हवे’, असे सांगणे, तेव्हामहर्षि आणि परात्पर गुरु यांच्या सांगण्यातून त्यांची समष्टीच्या कल्याणाचा विचार करण्याची तीव्र तळमळ दिसून येणे

‘यावर आता महर्षि काय उत्तर देतात ?’, अशी उत्कंठाही आपल्या मनात निर्माण होते. परात्पर गुरूंच्या यासांगण्यावर महर्षींनी सांगितले, ‘गुरूंना वाटते, ते योग्यच आहे; परंतु आपत्काळात साधकांनी आपल्या साधनेवर समाधानमानून बेसावध राहू नये, यासाठी आमचे हे परखड बोल आहेत.’ या प्रसंगात दोन्हीही विचार योग्यच आहेत. यातून देवी-देवता, गुरु आणि महर्षि यांची समष्टीच्या कल्याणाचा विचार करण्याची तीव्र तळमळ दिसून येते. वेळोवेळी ते आपल्या मार्गदर्शनातून‘साधनेच्या प्रवासात ‘अखंड सावधानता असणे’ या गुणाकडेच साधकांचे लक्ष वेधून घेण्याचा कसा प्रयत्न करत आहेत ?’, हेच लक्षात येते. अशा प्रकारच्या प्रसंगातून आपला ईश्वरी लीलेचा अभ्यास होतो.

३. या संभाषणातून महर्षींनी ‘अखंड सावधान !’, असा संदेशच साधकांना देऊन आपत्काळाची तीव्रता लक्षात आणून देणे

​महर्षि आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचे संभाषण काहीही असू दे; परंतु साधकांच्या दृष्टीने पहाता आपण सततसाधनारत रहाण्याचा प्रयत्न करायला हवा. साधनेत मुळीच कुचराई (ढिलाई) करता कामा नये. एक प्रकारे महर्षींनी ‘अखंडसावधान !’, असा संदेशच आपल्याला या संभाषणातून दिला आहे. यावरून आपत्काळाची तीव्रता आपल्या लक्षात येते.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)