
हरिद्वार, २४ एप्रिल (वार्ता.) – सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. ‘धर्माचरण कसे करावे ?’, ‘प्रत्येक कृती शास्त्रानुसार कशी करावी ?’, ‘गोमातेचे रक्षण करण्याची आवश्यकता काय ?’ आदी सर्व प्रदर्शनाद्वारे चांगल्या प्रकारे सांगितले आहे. हे कार्य प्रशंसनीय आहे. संपूर्ण विश्वामध्ये याचा प्रचार करणे आवश्यक आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी ज्या धर्माचरणाच्या कृती सांगितल्या आहेत, त्यानुसार प्रत्येकाने धर्माचरण करून स्वत:चे जीवन सुरक्षित करावे, असे प्रतिापदन ‘जम्मू-काश्मीर ट्रस्ट’चे शास्त्री वनमाळी यांनी येथे केले. येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी