नाशिक – अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने येथील ९ जणांचा एका दिवशी मृत्यू झाला. याआधी चक्कर येऊन चौघांचा एका दिवशी मृत्यू झाला. या सर्वांत तरुणांचा अधिक समावेश आहे. काहींना चालतांना चक्कर आली, तर काही जण घरातच चक्कर येऊन बेशुद्ध पडले. उष्णतेमुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याची चर्चा आहे; पण कारण स्पष्ट नाही.