कुंभमेळा येथून वर्धा येथे परत येणार्‍या भाविकांनी कोविड चाचणी करावी !

वर्धा येथील जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

वर्धा – उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यासाठी जिल्ह्यातून गेलेले काही भाविक आता परतीच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यात वाढत असलेली कोविड रुग्णांची संख्या आणि दिवसेंदिवस होत असलेला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कुंभमेळा येथून जिल्ह्यात परतणार्‍या सर्व भाविकांनी ‘कोविड सेंटर’ येथे स्वतः जाऊन कोविड पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. संबंधित व्यक्तींनी गृहविलगीकरणात राहून नियमांचे कोटेकोरपणे पालन करावे. कुंभमेळ्यात गेलेल्या आणि परत आल्यावर गृहविलगीकरणात न रहाणार्‍या व्यक्तींविषयी कुणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी येथील पोलीस नियंत्रण कक्षाला १०० या क्रमांकावर संपर्क करावा, असेही त्या म्हणाल्या.