मुंबई – माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला होता. त्यामुळे ते घरीच अलगीकरणात होते; परंतु आता आधुनिक वैद्यांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्यास सांगितले.
Thank you for your wishes and prayers. As a matter of abundant precaution under medical advice, I have been hospitalised. I hope to be back home in a few days. Take care and stay safe everyone.
Wishing all Indians & my teammates on the 10th anniversary of our World Cup 🇮🇳 win.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2021
‘माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्या आणि शुभेच्छा देणार्या सर्वांचे आभार ! दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये भरती झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन’, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा !’, असे विधान सचिन तेंडुलकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले.