अकोला येथे धर्मांधांकडून होळीची विटंबना आणि हिंदूंना मारहाण !
|

अकोला – येथील पोला चौकातील हनुमान मंदिराच्या परिसरात होळीच्या दिवशी म्हणजे २८ मार्चला २०० ते ३०० जणांच्या धर्मांधांच्या जमावाने होळीदहनाच्या वेळी पुष्कळ अडथळे आणले. हिंदूंनी होळी पेटवल्यावर धर्मांधांनी त्यावर पाणी ओतले आणि लाथा मारून आग विझवली, तसेच हिंदूंना मारहाण केली. यासंदर्भातील चित्रफीत सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. याविषयीचे वृत्त ‘ऑप इंडिया’ने प्रसिद्ध केले आहे. (सरकारने यात लक्ष घालून धर्मांधांवर कठोर कारवाई करून हिंदूंना न्याय मिळवून द्यावा ! – संपादक)
हनुमान मंदिर आणि परिसर हा मुसलमानबहुल भाग आहे. स्थानिक हिंदू प्रत्येक शनिवारी येथे हनुमान चालिसा म्हणणे आणि आरती करणे यांसाठी एकत्रित जमतात. (हिंदूंच्या या कृतीमुळे संतप्त होऊनच धर्मांधांनी होलिकोत्सवाच्या संदर्भात असे कृत्य केले आहे, हे निश्चित ! असे जरी असले, तरी हिंदूंनी असे करणे न थांबवता धर्मांधांना खडसवण्यासाठी संघटित व्हावे ! – संपादक)
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !