‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३१.३.२०२१ या दिवशी तिथीनुसार येत असलेल्या जयंतीनिमित्त गुरूंच्या कृपेने सुचलेले विचार त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.
१. प्रभुु श्रीराम, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मावळे असण्याची इच्छा ईश्वराने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी करवून घेऊन पूर्ण करणे
लहानपणी दूरदर्शनवरील ‘रामायण’ ही मालिका बघतांना मला नेहमी वाटायचे, ‘मी प्रभु श्रीरामाच्या सैन्यात वानर म्हणून सहभागी असायला हवे होते.’ नंतर शालेय जीवनात असतांना मला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजायला लागला. तेव्हा मला वाटायचे, ‘मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळे म्हणून असायला हवे होते.’ ईश्वराने मला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात सहभागी करून घेतले. त्यामुळे ‘माझी इच्छा पूर्ण झाली’, असे मला वाटते.
२. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य यांत साम्य जाणवणे
ज्या कार्याला ईश्वरी अधिष्ठान असते, ते कार्य दैवी असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे धर्मकार्य, ईश्वरी कार्य, म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य होते. त्याप्रमाणेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य ईश्वरी अधिष्ठान ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने चाललेले कार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य आणि या संस्था करत असलेले कार्य यांचा उद्देश समान आहे. केवळ कार्य करण्याच्या पद्धती आणि मापदंड यांत काळानुसार पालट झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य यांच्यामध्ये माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले साम्य या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न गुरूंच्याच कृपेने करत आहे.
२ अ. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती कार्य करत असणे : येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ईश्वरी कार्याशी तुलना करण्याचा अथवा त्यांच्या कार्याला न्यून लेखण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. कुणी तसा अर्थ काढूही नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि आशीर्वाद घेऊनच सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे. गेल्या २० वर्षांपासून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या माध्यमातून ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’ हा केंद्रबिंदू ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करत असतांना जे मला जाणवले, ते मी गुरूंच्या कृपेने या ठिकाणी मांडत आहे.
२ अ १. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य यांच्यातील साम्य
२ अ १ अ. किल्ले बांधणारे अप्रतिम शिल्पकार हिरोजी इंदुलकर ! : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांचे किल्ले बांधणारे अप्रतिम शिल्पकार म्हणजे हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर यांनी अत्यंत परिश्रमाने महाराजांनी दिलेल्या कालावधीमध्ये भक्कम असा रायगड उभा केला. त्याचे वर्णन ते काय करावे ! प्रत्यक्ष ईश्वराने त्याची महती गावी, असा रायगड त्यांनी उभा केला. त्यांनी रायगडावर जगदिश्वराचे मंदिर बांधले. त्या कामाची परतफेड म्हणून त्यांनी राजांकडे काय मागावे ? त्यांनी राजाला विनंती केली, ‘जगदीश्वराच्या पायरीवर माझ्या नावाचा दगड बसवावा आणि त्या दगडांवर पाय ठेवून आपण जगदीश्वराचे दर्शन घ्यावे.’ ‘सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर’, असे लिहिलेली पायरी आजही रायगडावर त्या जगदीश्वराच्या मंदिराला आहे.
२ अ १ अ १. सर्वस्वाचा त्याग करून सनातन संस्थेच्या आश्रमांचे बांधकाम करणारे साधक बघून छत्रपतींच्या मावळ्यांची आठवण होणे : सर्वस्वाचा त्याग करून अहोरात्र आश्रम बांधकामासाठी प्रयत्न करणारे साधक बघून छत्रपतींचे मावळे शिल्पकार इंदुलकर यांची आठवण होते. सनातन संस्थेचे भव्य आश्रम दृष्टीत भरतात. त्या आश्रमाच्या उभारणीसाठी झटणारेे बांधकामाशी संबंधित साधक सहज लक्षात येत नाहीत.
२ अ १ आ. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वस्वाचा त्याग करणारे साधक’, ही ईश्वरी कार्याची साक्ष ! : हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य करणारे जसे छत्रपतींचे मावळे होते, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी झोकून देऊन सर्वस्वाचा त्याग करणारे शेकडो साधक आज सनातन संस्थेमध्ये विनावेतन पूर्णवेळ कार्यरत आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हे ईश्वरी कार्य करत असल्याची ही एक साक्ष आहे.
२ अ १ इ. विविध प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक सरदार हिंदु धर्माचे रक्षण करत होते, त्याप्रमाणे विविध राज्यांत अनेक साधक कार्यरत असणे : ‘पूर्ण भारतात हिंदूंचे मोगलांपासून रक्षण व्हावे’, यासाठी वेगवेगळ्या प्रांतात मराठा सरदार पाठवले गेले होते. त्या काळात शिंदे – शिंदिया, होळकर, नरेश गायकवाड आदी होते आणि त्यांनी त्या त्या प्रांतात हिंदु धर्म राखला होता. त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आज मध्यप्रदेश, देहली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, पंजाब आदी राज्यांत अनेक साधक हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत आहेत. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, पू. नीलेश सिंगबाळ आणि श्री. शंभू गवारे आदी या कार्यात सेवारत आहेत.
२ अ १ ई. हिंदु राष्ट्रासाठी अनेक महिला संत आणि सद्गुरु योगदान देत असणे : हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जसे ताराबाई, येसूबाई, जिजामाता यांचे योगदान होते, त्याचप्रमाणे आज हिंदु राष्ट्रासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आदी अनेक महिला संत योगदान देत आहेत आणि त्या साधकांकडून साधना करवून घेत आहेत.
२ अ १ उ. स्वराज्यात कुणीही लहान-मोठा नव्हता, लोकांमध्ये जातीवरून भेदभाव केला जात नसे, त्याप्रमाणेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुणीही लहान-मोठा नाही. सर्व जण हिंदु राष्ट्राचे केवळ सेवक आहेत.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य अद्वितीय अन् ईश्वरीय आहे. ‘त्याचे वर्णन करणे’, माझ्यासारख्या सामान्य जिवाला केवळ अशक्य आहे.
जय गुरुदेव !’
– गुरुसेवक, श्री. विजय पाटील, वापी (१५.२.२०२१)