मुंबई – यशवंत पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने द्वितीय आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. यांसाठी अनुक्रमे ३० लाख रुपये, २० लाख रुपये, तसेच १७ लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रथम क्रमांक कुडाळ (जि. सिंधुदुर्ग), कागल (जिल्हा कोल्हापूर) पंचायत समितीने द्वितीय, तर भंडारा (जिल्हा भंडारा) पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला. या पंचायत समित्यांसाठी अनुक्रमे २० लाख रुपये, १७ लाख रुपये आणि १५ लाख रुपये, तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.