आमच्याशी चर्चा केल्याविना ख्रिस्तीबहुल मतदारसंघातील उमेदवार निवडू नये !

केरळमधील सायरो-मलबार चर्चची काँग्रेसला चेतावणी !

  • निधर्मी भारतात चर्चची ही धार्मिक दादागिरी केरळमधील ढोंगी निधर्मीवादी साम्यवाद्यांना आणि देशातील तथाकथित पुरो(अधो)गाम्यांना चालते का ?
  • अशी चेतावणी एखाद्या हिंदूंच्या संतांनी किंवा धर्मपीठाने दिली असती, तर याच निधर्मीवाद्यांनी आकाशपाताळ एक केले असते !
सायरो-मलबार चर्च

थिरूवनंतपूरम् (केरळ) – येत्या मे मासामध्ये होणार्‍या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चशी चर्चा केल्याविना ख्रिस्त्यांची लोकसंख्या अधिक असणार्‍या मतदारसंघातील कुठल्याही उमेदवाराची उमेदवारी अंतिम करण्यात येऊ नये, अशी चेतावणी केरळमधील सायरो-मलबार चर्चने काँग्रेस पक्षाला दिली आहे.

चर्चच्या अधिकृत मुखपत्रातील संपादकीयमध्ये लिहिण्यात आले आहे की, आर्चबिशप मार जोसफ पेरुमोत्तम यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने ख्रिस्ती धर्माच्या बाहेरील उमेदवाराला निवडणुकीत उभे करू नये.