‘अ‍ॅपल’चा ‘आयपॅड’ आता भारतात निर्मित होण्याची शक्यता !

‘अ‍ॅपल’चा ‘आयपॅड’ आता भारतात

नवी देहली – अमेरिकेतील स्मार्टफोन निर्माता ‘अ‍ॅपल’ आस्थापन सध्या त्याच्या ‘आयपॅड’चे उत्पादन चीनमध्ये करत असले, तरी त्याचे उत्पादन भारतात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमधील प्रकल्प हालवून तो भारतात आणण्याची सिद्धता ‘अ‍ॅपल’ करत असल्याचे सांगितले जात आहे.

भारत सरकारकडून स्मार्टफोन्स निर्यातीला अधिक चालना मिळावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत सुमारे ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येईल, असे घोषित करण्यात आल्याने ‘अ‍ॅपल’ या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहे. त्यामुळे भारतात ‘आयपॅड’चे उत्पादन करण्यासाठी प्रारंभी ‘अ‍ॅपल’कडून २० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.