अंबरनाथ येथील रिपाईच्या माजी शहराध्यक्षांची तहसीलदारांना गोळ्या घालण्याची धमकी !

पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

कायद्याचे भय न वाटणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते निवडून आल्यावर जनतेला न्यायाचे राज्य देतील का ?

ठाणे – अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत; मात्र मतदार सूची सिद्ध करतांना त्यामध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्ष करीत आहे. त्यातच रिपाईचे माजी शहर अध्यक्ष अजय जाधव यांनी थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. याविषयी अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता अजय जाधव यांच्या चित्रिकरणावरून त्यांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असल्याचे सांगितले.