![]()
पणजी, ३ मे (वार्ता.) – मे अखेरपर्यंत अपेक्षित कागदपत्रे सादर न केल्यास ५० सहस्र लाभार्थी ‘गृह आधार’ योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी मे अखेरपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र (‘लाईफ सर्टीफिकेट) आणि वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र सादर न केल्यास गोवा सरकारचे महिला आणि बाल विकास खाते संबंधित लाभार्थींची नावे लाभार्थी सूचीमधून रहित करणार आहे. महिला आणि बाल विकास खात्याने संबंधित लाभार्थ्यांना अपेक्षित कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. खात्याने संबंधित लाभार्थ्यांना मासिक आर्थिक साहाय्य देणे तुर्तास स्थगित ठेवले आहे.
एखाद्या प्रकरणी लाभार्थीचे निधन झालेले असेल आणि योजनेचे आर्थिक साहाय्य जर अधिकोषात पडून असेल, तर ती रक्कम परत मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे खात्याने कळवले आहे. गोवा सरकारची ‘गृह आधार’ योजना वर्ष २०१६ पासून प्रारंभ झाली आहे आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या योजनेच्या अंतर्गत गृहिणींना मासिक आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती आणि पत्नी यांचे एकूण वार्षिक उत्पन्न ३ लक्ष रुपयांपेक्षा अधिक असू नये. सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणारी आणि मूल असलेली विधवा महिला ‘गृह आधार’ योजनेचाही लाभ घेऊ शकते.
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद