दिशा रवि, निकिता जेकब आणि शांतनु यांनी ‘टूलकिट’ बनवले आणि ‘शेअर’ केले ! – देहली पोलीस

दिशा रवि, निकिता जेकब आणि शांतनु

नवी देहली – दिशा रवि, निकिता जेकब आणि शांतनु मुळुक यांनी ‘टूलकिट’ (शेतकरी आंदोलनाविषयीची प्रसारित केलेली संपूर्ण रूपरेषा) बनवले आहे संकलन करण्यासाठी इतरांना शेअर केले, अशी माहिती देहली पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, टूलकिट प्रकरणात खलिस्तावादी ‘पोएटीक जस्टिस फाउंडेशन’चाही सहभाग आहे. जानेवारीत टूलकिट बनवण्यात आले जेणेकरून आंदोलन अधिक वाढेल. ते परदेशात पोचवता येईल आणि परदेशातील भारतीय दूतावासांना लक्ष्य केले जाईल. ११ जानेवारी या दिवशी ‘झूम’वर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये निकिता, शांतनु, दिशा यांच्यासह ६० ते ७० जण सहभागी झाले होते. यात ठरवण्यात आले होते की, २६ जानेवारीला ‘ट्विटर स्टॉर्म’ (मोठ्या संख्येने ट्वीट्स करणे) निर्माण केले जाईल.