विश्वव्यापक जगद्वंद्य परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘२३.११.२०२० या दिवशी जमखंडी (कर्नाटक) येथील पू. सदानंद भस्मे महाराज यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे दिले आहेत.
१. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधनाचे कार्य आणि त्याची व्याप्ती ऐकल्यावर पू. भस्मे महाराज म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शक्ती अद्भुत आहे. त्यांनी साधकांना मोठ्या संख्येने सिद्ध केले आहे. या कार्याला यश मिळू दे.’’
२. इथे (रामनाथी) आश्रमात असणारे साधक पुष्कळ भाग्यवान आहेत. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळत आहे.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती शिकवली जाते. या विषयी पू. भस्मे महाराज म्हणाले, ‘‘Work is Worship (कार्य ही देवपूजा आहे.) या उक्तीप्रमाणे गुुरुदेव प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीप्रमाणे साधना शिकवून त्याचा उद्धार करत आहेत. अनेक कला पुनजीर्वित करून या क्षेत्राला दिव्य केंद्र बनवणार्या परात्पर गुरु डॉक्टरांना माझा साष्टांग साष्टांग नमस्कार आहे.’’
४. परात्पर गुरु डॉक्टर हे कामधेनू आहेत.
५. संपूर्ण विश्वात असे आध्यात्मिक कार्य पहायला मिळत नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांसारखे सत्पुरुष भारतात आहेत’, या विषयी मला अभिमान वाटतो.
६. प.पू. डॉक्टरांच्या अस्तित्वामुळे साधकांना साधना आणि कार्य यांसाठी शक्ती मिळणार आहे. गुरुदेवांना वेगळे काही करावे लागणार नाही.
पू. भस्मे महाराज त्यांच्या शिष्यांना म्हणाले, ‘‘सनातनचे साधक धर्मकार्याविषयी सांगत असलेली माहिती नीट ऐका. गावी गेल्यानंतर हे सर्व तुम्हाला समाजाला सांगायचे आहे.’’
– सौ. विद्या शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |