ब्रिटीश ‘स्नायपर’च्या ९०० मीटरवरून झाडलेल्या एका गोळीद्वारे इस्लामिक स्टेटचे ५ आतंकवादी ठार !

प्रतिकात्मक छायाचित्र

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या ‘स्पेशल एयर सर्व्हिस (एस्.ए.एस्.) या सैन्य शाखेच्या स्नायपरने (दूरवरून बंदूकीद्वारे लक्ष्यभेद करणारा) ९०० मीटर अंतरावरून इस्लामिक स्टेटच्या एका आत्मघाती आतंकवाद्याच्या अंगावर बॉम्ब असलेल्या जॅकेटवर गोळी झाडली.


यामुळे जॅकेटमधील बॉम्बचा स्फोट होऊन या आतंकवाद्यासमवेत तेथे उपस्थित असणारे अन्य ४ आतंकवादीही ठार झाले. यात एक कमांडरचा समावेश आहे. ही घटना सीरियामध्ये घडली.