मुंबई – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील अस्थायी वैद्यकीय अधिकार्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, तसेच सातवा वेतन आयोग लागू करणे या मुख्य मागण्यांसाठी ११ जानेवारी या दिवशी सकाळपासून राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत. अनुमाने ४५० वैद्यकीय अधिकार्यांनी (आधुनिक वैद्य) सकाळी ८ वाजल्यापासून काम बंद केले आहे. याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होतांना दिसत आहे.
वरील २ मागण्या कित्येक मासांपासून आहे. यासाठी नोव्हेंबर मासातही आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी या अधिकार्यांना कायमस्वरूपी सेवेत भरती करून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण हे आश्वासन हवेतच विरले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री असा सरकारी स्तरावर पाठपुरावा करूनही सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे अप्रसन्न झालेली राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील आधुनिक वैद्य यांनी लाक्षणिक संप केला.

Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण