नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने नव्या संसदेच्या आणि अन्य इमारतींच्या प्रकल्पाला संमती दिली आहे. केंद्र सरकारकडे बांधकामासंबंधीची सर्व कागदपत्रे योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. या प्रकल्पाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना केंद्राने भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्यावरून न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली होती; मात्र नंतर त्याला अनुमती देण्यात आली होती. तसेच न्यायालयातील याविषयीच्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाने बांधकाम करण्यास अनुमती दिली आहे.