- आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.
- ‘भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणावी.
- आरतीचा अर्थ लक्षात घेऊन म्हणावी.
- आरती म्हणतांना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असावा.
- आरती म्हणत असतांना प्राथमिक अवस्थेतील साधकाने टाळ्या वाजवाव्यात, तर त्यापुढील अवस्थेतील साधकाने टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.
- घंटा मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
- आरती म्हणत देवाला ओवाळतांना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.
- तबक देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाचे अनाहतचक्र ते आज्ञाचक्र असे गोलाकार ओवाळावे.
- ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना म्हणावी.
- यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
- कापूर-आरती ग्रहण करावी. ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवून आरती ग्रहण करावी. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
- देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
- त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
- यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
- मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आरती कशी करावी ?’)