
कोल्हापूर – गत मासापासून इंग्लंडमधील नवीन कोरोना संसर्गामुळे पुन्हा चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर इंग्लंडहून आलेल्या एकूण ६२ व्यक्तींची जिल्हा आरोग्य यंत्रणेने पडताळणी केली आहे. यांपैकी ५९ व्यक्तींच्या कोरोना चाचणी अहवालात ते सर्व कोरोनाबाधित नाहीत, असे आढळले आहे. अन्य तिघांच्या अलगीकरणाचे २८ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांची चाचणी केलेली नाही. जिल्ह्यात इंग्लंडहून अथवा परदेशातून आलेला एकही प्रवासी कोरोनाबाधित नाही, अशी माहिती आरोग्य सेवेतील वरिष्ठ आधुनिक वैद्यांकडून देण्यात आली आहे.
इंग्लंडमधून आलेल्या १० व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची चर्चा होती. आरोग्य यंत्रणेने याचे अन्वेषण केले आहे. गत ८ दिवसांत इंग्लंडहून कुणीही आलेले नाही आणि कुणाचीही पडताळणी शासकीय प्रयोगशाळेकडे झालेली नाही. ती केवळ अफवा होती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
वेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !