मडगाव – मुसलमानांच्या उद्धारासाठी मुसलमानांच्या एका गटाने ‘निज गोंयकार मुस्लिम’ संघटनेची स्थापना केली आहे. उद्योजक नितीन कुंकळ्ळेकर, दंततज्ञ डॉ. हर्बर्ट गोम्स आणि इतिहासतज्ञ प्रा. प्रजल साखरदांडे यांच्या उपस्थितीत या संघटनेची स्थापना करण्यात आली.
या निमित्ताने आयोजित सोहळ्यात उद्योजक नितीन कुंकळ्ळेकर म्हणाले, ‘‘नवीन गोवा सिद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांना समान वागणूक देणारा गोवा सिद्ध करायचा आहे. केपे येथे बालपणी माझे अल्पसंख्य समुदायातील एका कुटुंबियांशी खूप चांगले संबंध होते.’’ डॉ. हर्बर्ट गोम्स यांनी या वेळी त्यांना लहानपणापासून मुसलमान समाजातील एका कुटुंबाकडून मिळत असलेल्या चांगल्या वागणुकीविषयी माहिती दिली. समाजात शांती प्रस्थापित होऊन समाजाचा विकास होण्यासाठी सर्वांवर प्रेम करणे आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले. प्रा. प्रजल साखरदांडे यांनी गोवा मुक्तीपूर्वी मुसलमान समाजाच्या योगदानाविषयी माहिती दिली.

नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त