
मुंबई – नाशिक येथील माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी २१ डिसेंबर या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयामध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक महापालिकेतील भाजपचे पहिले महापौर म्हणून बाळासाहेब सानप यांनी कामकाज पाहिले आहे. ते गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधाससभेची निवडणूक लढवली; मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ४ दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काही नेत्यांमुळे पक्ष सोडत असल्याचे सांगितले होते.
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
PM MODI NEET Paper Leak : शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !