साधकांना स्थुलातून सूक्ष्माकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक अध्यात्मप्रसाराचे कार्य सर्वत्र चालू आहे आणि त्यांचे सूक्ष्मातील अद्वितीय कार्यही चालू आहे. ते कृपा, दया आणि प्रीती यांचा महासागर असल्याने सर्वांनाच त्यांचा सगुणातील सत्संग हवा असतो; मात्र त्यास मर्यादा असल्याचे त्यांनी त्यांच्या प्रत्येक ग्रंथातील आरंभीच्या पृष्ठावर ४ ओळींत सांगितले आहे. (पुढील कवितेतील प्रत्येक कडव्यातील पहिली ओळ ठळक अक्षरांत दिली आहे.)
‘स्थूल देहा असे स्थळ काळाची मर्यादा’,
असे परम पूज्य (टीप १) सांगती ।
स्थळ काळाच्या मर्यादेत राहूनी,
सहस्रो साधकांना परम पूज्य दर्शन देती ।
म्हणूनची परम पूज्य मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम शोभती ॥ १ ॥
‘कैसे असू सर्वदा सर्वा ठायी’, असे परम पूज्य सांगती ।
साधकजन परम पूज्यांचे चैतन्यमय अस्तित्व नित्य अनुभवती ।
म्हणूनची परम पूज्य साक्षात् विष्णूचा (टीप २) अवतार शोभती ॥ २ ॥
‘सनातन धर्म माझे नित्य रूप’, असे परम पूज्य सांगती ।
साधकांकडून ‘धर्मो रक्षति रक्षितः।’ (टीप ३)
ही कृती करवूनी घेती ।
म्हणूनची परम पूज्य हिंदु राष्ट्राचे उद्गाते शोभती ॥ ३ ॥
‘त्या रूपे सर्वत्र आहे सदा’, असे परम पूज्य सांगती ।
साधकजन परम पूज्यांचे सूक्ष्म रूप हृदयी साठविती ।
म्हणूनची परम पूज्य साधकांचे प्राणसखा शोभती ॥ ४ ॥
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे महर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले आहे.
टीप ३ – ‘धर्मो रक्षति रक्षितः।’, म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.११.२०२०)
|