‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘सूर्योपासने’विषयीचे संशोधन सादर

‘पूर्वांचल गौरव’ या संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन छठ महापर्व’ कार्यक्रम

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत
डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

फोंडा (गोवा) – छठ पर्व मूलतः सूर्य षष्ठी व्रत असल्याने त्याला ‘छठ’ असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून उत्तर-पूर्व भारतात, विशेषतः ओडिशा, बिहार, झारखंड आणि बंगाल येथील काही भागांमध्ये हा उत्सव पुष्कळ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. छठ व्रत म्हणजे सूर्योपासना. या छठ पर्वानिमित्त ‘पूर्वांचल गौरव’ या संस्थेने १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘ऑनलाईन छठ महापर्व’ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात २० नोव्हेंबर या दिवशी सूर्योपासनेविषयीचे अध्यात्मशास्त्र वैज्ञानिक भाषेत समजावून सांगण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने यासंबंधी केलेले आध्यात्मिक संशोधन सांगणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. हे संशोधन ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म-परीक्षण यांच्या साहाय्याने करण्यात आले. या कार्यक्रमात छठ महापर्वाविषयीच्या संशोधनाचे सादरीकरण महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी केले.

या व्हिडिओमध्ये सूर्योपासनेच्या अंतर्गत पुढील कृत्ये करणार्‍या ‘सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या आणि त्रास नसलेल्या’ व्यक्तींवर होणार्‍या सूक्ष्म-ऊर्जास्तरीय परिणामांचा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेला अभ्यास मांडण्यात आला.

सूर्योपासनेच्या अंतर्गत करण्यात आलेली कृत्ये

१. सूर्याला सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी अर्घ्य देणे

२. गायत्रीमंत्राचा १०८ वेळा जप करणे

३. सूर्याची बारा नावे न घेता सूर्यनमस्कार घालणे आणि सूर्याची बारा नावे घेत सूर्यनमस्कार घालणे

कोणत्याही उपासनेचा मूळ परिणाम सूक्ष्मस्तरावर होत असतो. हा परिणाम केवळ सूक्ष्म-परीक्षणानेच ज्ञात होऊ शकतो. यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील सूक्ष्मातील घडामोडींविषयी ज्ञान मिळणार्‍या आणि ते चित्राच्या रूपाने (म्हणजेच सूक्ष्म-चित्र रूपाने) मांडू शकणार्‍या संशोधन समन्वयक कु. प्रियांका लोटलीकर यांनी काढलेले सूर्यपूजेच्या वेळी घडणारी सूक्ष्मातील प्रक्रिया उलगडून दाखवणारे सूक्ष्म-चित्र सादर केले.

(वाचकांना निवेदन : या कार्यक्रमात सूर्योपासनेसंबंधी सादर करण्यात आलेले आध्यात्मिक संशोधन वाचकांच्या माहितीसाठी लवकरच लेख रूपाने प्रसिद्ध करण्यात येईल.)