महाराष्ट्रात कोरोनाच्या १ कोटी चाचण्या झाल्या

मुंबई –  राज्यात २० नोव्हेंबर या दिवशी ६ सहस्र ९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ सहस्र ९१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ५ सहस्र ६४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.