सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी आणि ‘गुरु’ या शब्दाविषयी वेगळीच आनंददायी अनुभूती येणे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘२.५.२०२० या दिवशी माझ्याकडून झालेली एक चूक मी लिहून सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांना पाठवली. तेव्हा त्यांनी मला कळवले, ‘ही चूक केवळ मला न पाठवता अन्य साधकांना पाठवावी (‘शेअर’ करावी).’ हे सूत्र वाचतांना मला जाणवले, ‘सद्गुरु काकांनी पाठवलेल्या सूचनेच्या समवेत एक वेगळ्याच प्रकारची शक्ती माझ्यामध्ये आली.’ त्याच वेळी माझ्या मनात सद्गुरु काकांविषयी विचार आला, ‘हे गुरु आहेत.’ यातील ‘गुरु’ शब्दाच्या विचारात एवढी निराळी गोष्ट होती, जी मी अनुभवू शकले; पण त्याविषयी शब्दांत सांगणे कठीण आहे. तो अनुभव पुष्कळच वेगळा होता. त्या वेळी ती चूक सर्वांना ‘शेअर’ करतांना माझ्या मनात पूर्वीप्रमाणे प्रतिमेचे विचार आले नव्हते. तेव्हा माझ्या मनात सद्गुरु काकांप्रती भाव होता, ‘मी जणू एक लहान मुलगी आहे आणि ते मला सांभाळत आहेत.’ घरातील ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे माझे मन त्यांच्याशी भावनात्मक जोडले होते; परंतु त्या दिवसापासून मला ‘गुरु’ या शब्दाविषयी एक वेगळीच अनुभूती येऊन माझ्या मनाची एक प्रकारची आनंददायी स्थिती झाली आहे. यासाठी मी गुरुदेव आणि सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. पूनम किंगर, फरीदाबाद, हरियाणा. (१२.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक