नागपूर येथे ७ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन

     

  मुंबई, १० जुलै (वार्ता.) – यंदाचे राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून चालू झाले होते. राज्यात मोठा पाऊस झाल्याने अपवादात्मक वगळता १ दिवस अधिवेशनाचे कामकाज झाले नाही. त्यानंतर १० जुलैपर्यंत हे अधिवेशन चालले. आता ‘पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबर या दिवशी होणार आहे’, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.