टँकर रिक्शावर आदळून दोघांचा मृत्यू, एक गंभीर घायाळ !

ठाणे, ९ जुलै (वार्ता.) – ठाणे-घोडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात ८ जुलैला दुपारी १२.३५ वाजता महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर रिक्शावर आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत रिक्शाचालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण घायाळ झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.