
मुंबई – महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांनी विधीमंडळात आल्यावर महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाच्या कार्यालयात नव्हे, तर चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ८ जुलै या दिवशी शरद पवार विधानभवनात आले होते. विशेष म्हणजे मंत्रीमंडळाची बैठक अर्धवट सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या कार्यालयात येऊन शरद पवार यांचे स्वागत केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या समितीचे सदस्य म्हणून खासदार शरद पवार विधानभवनात उपस्थित होते. ही बैठक झाल्यावर शरद पवार यांनी स्वत:च्या पक्षांच्या आमदारांची बैठक एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात घेतली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजीत पाटील उपस्थित होते; मात्र रोहित पवार बैठकीला अनुपस्थित होते.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर