Jalalabad Renamed : जलालाबाद आता बनले ‘भगवान परशुराम पुरी’

उत्तरप्रदेश सरकारचा स्तुत्य निर्णय !

योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने शाहजहानपूर जिल्ह्यातील जलालाबाद तालुक्याचे नाव पालटण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ६ जुलै या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत जलालाबाद तालुक्याचे नवीन नाव ‘भगवान परशुराम पुरी’ करण्याच्या प्रस्तावाला संमती देण्यात आली.

१. मंत्रीमंडळाची संमती मिळाल्यानंतर आता नाव पालटाशी संबंधित आवश्यक प्रशासकीय आणि महसूलविषयक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. यानंतर नवीन नाव शासकीय नोंदीं आणि इतर अधिकृत कागदपत्रे यांमध्ये लागू केले जाईल.

२. या बैठकीत विविध विभागांशी संबंधित अनुमाने २८ महत्त्वाच्या प्रस्तावांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

३. ‘उत्तरप्रदेश स्टार्टअप धोरण-२०२६’ आणि ‘डेटा सेंटर धोरण-२०२६’ या उपक्रमांनाही मंत्रीमंडळाने संमती दिली आहे. ‘या धोरणांमुळे गुंतवणूकदार राज्याकडे आकर्षित होतील, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, तसेच राज्याच्या डिजिटल आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल’, असे सरकारने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

आता केंद्र सरकारने भारतातील शहरे, गावे आणि जिल्हे यांना असलेल्या विदेशी आक्रमकांची नावे पुसून टाकण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोहीम हाती घेणे आवश्यक आहे !