उद्या अर्थसाहाय्य वितरण आणि प्रस्थान सोहळा

पणजी, ४ जुलै (वार्ता.) – श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक वारशाच्या शतकानुशतके जुन्या परंपरेचा सन्मान करत गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाकडून वार्षिक पंढरपूर वारी करणार्या गोव्यातील नोंदणीकृत वारकरी दिंड्यांसाठी नव्याने चालू करण्यात आलेल्या योजनेच्या अंतर्गत ‘अर्थसाहाय्य वितरण आणि प्रस्थान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ६ जुलै २०२६ या दिवशी सकाळी १०.३० वाजता कला अकादमी, गोवा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांच्यासह इतर मंत्री आणि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
गोव्याच्या समृद्ध भक्ती परंपरेचे जतन करून पंढरपूरच्या पवित्र यात्रेला जाणार्या नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना पाठबळ देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना आर्थिक साहाय्य दिले जाईल.
या योजनेनुसार ४० ते ५० नोंदणीकृत वारकरी असलेल्या दिंड्यांसाठी १ लाख रुपये, ५० हून अधिक वारकरी असलेल्या मोठ्या गटांसाठी प्रति वारकरी २ सहस्र रुपये याप्रमाणे आर्थिक साहाय्य दिले जाईल. प्रत्येक दिंडीला अधिकाधिक ५ लाख रुपयांपर्यंतचे साहाय्य केले जाईल. वारीतील सहभाग सुलभ करणे, वारकर्यांची सुरक्षा आणि सोयी-सुविधा वाढवणे आणि यात्रेशी संबंधित उपक्रमांना पाठबळ देणे हा या आर्थिक साहाय्याचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यात आजोबा माऊली वारकरी संप्रदाय, केरी, सत्तरी यांच्याकडून ‘हरिपाठ’ पठण केले जाईल, तसेच ओम नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ, आमोणा, डिचोली यांच्याकडून पारंपरिक वारकरी दिंडीचे सादरीकरण होईल.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !