‘जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)’च्या निवडणुकीसाठी ५ सहस्र ४३९ ठराव प्रविष्ट !

कोल्हापूर – ‘जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)च्या निवडणुकीसाठी २ जूनपासून चालू झालेल्या ठराव प्रविष्ट करण्याच्या प्रक्रियेत एकूण ५ सहस्र ४३९ ठराव प्रविष्ट झाले आहेत. १५ जुलैपर्यंत या ठराव प्रविष्ट केलेल्या संस्थांना नोटीस पाठवून त्यांची सुनावणी घेऊन हे ठराव अंतिम केले जाणार आहेत. महायुती आणि ‘राजर्षी शाहू समविचारी आघाडी’ यांच्या वतीने शक्तीप्रदर्शनाने अर्ज प्रविष्ट करण्यात आले आहेत. या ठरावांची सत्यता पडताळण्यासाठी संबंधित ठरावदार, संबंधित कागदपत्रे, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह इतर सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. याच पदाधिकार्‍यांना विचारून खर्‍या ठरावदारांचे नाव सूचीत समाविष्ट केले जाणार आहे.