
‘एकदा एका संतांच्या भक्तांची भेट झाली. त्यांच्या भेटीतून लक्षात आले की, त्यांनी त्या संतांची खूप वर्षे सेवा केली. त्यामुळे त्यांना त्या संतांच्या संदर्भातील अनेक प्रसंग बारकाव्यांसह लक्षात आहेत; पण भक्तांमध्ये दोष आणि अहं यांची तीव्रता अधिकच आहे. त्या भक्तांनी संतांची सेवा केली; पण त्यांची शिकवण आत्मसात केली नाही. थोडक्यात संतांचा लाभ हा केवळ त्यांच्यासोबत रहाण्याने होत नाही, तर त्यांची शिकवण आत्मसात केल्याने होतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आध्यात्मिक लिखाणाचा संग्रह करण्याचा एक उद्देश
‘अध्यात्मातील जिज्ञासूला काही वेळा एखादे वाक्यपण साधना करण्याची स्फूर्ती देणारे ठरते. याच उद्देशाने अध्यात्मातील जिज्ञासूंना त्यांच्या त्यांच्या साधनामार्गातील मार्गदर्शक लिखाण उपलब्ध व्हावे यासाठी सुमारे ५००० ग्रंथ होतील, इतके लिखाण संग्रही केले आहे. ते ग्रंथस्वरूपात प्रकाशित केले जात आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आपण कल्पना करू शकत नाही असे कार्य, म्हणजे ‘सनातन संस्थे’ची स्थापना आणि सनातनच्या ३७० हून अधिक ग्रंथांचे प्रकाशन ! हे केवळ देवाच्या आशीर्वादानेच झाले आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.५.२०२६)
साधकांवर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करणारे म्हार्दोळ, गोवा येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७७ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधिकेला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘मुलगा विदेशात असणे’, ही अभिमानाची नाही, तर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण आणि महत्त्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !