
१. ‘नकारात्मक विचारांनी भरलेले मन हे एकप्रकारे भुताच्या घरासारखे असते. सेवेमुळे मनातील नकारात्मक विचारांचा लय होतो.
२. भगवंताची लीला अनुभवणे, म्हणजेच साधना आहे.
३. ‘आत्मशुद्धीसाठी’ केलेले प्रामाणिक प्रयत्न, म्हणजे ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ प्रामाणिकपणे राबवणे आहे.
४. आपल्याला आपल्या देहाची विभूती बनवायची आहे, सामान्यांप्रमाणे राख करायची नाही. यासाठी साधना करून देह शुद्ध करावा लागतो, तरच देह जळल्यानंतर त्याची विभूती बनते.
५. देह म्हणजे शिररावर पांघरलेले एक वस्त्रच आहे. त्यालाही नंतर टाकायचे आहे. ते चितेवर जळले की, देह नष्ट होतो; पण आत्मा अविनाशी रहातो.’
६. ‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१०.१.२०१६) ॐ
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
साधिका रुग्णाईत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने तिला आनंदी रहाता येणे
६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवाच्या मृत्यूनंतर एखादा सात्त्विक प्राणी किंवा पक्षी याच्या माध्यमातून देवतातत्त्व मृत जिवाला आशीर्वाद द्यायला आलेले असणे
स्वतःचे मन पूर्णपणे स्वीकारल्याने आत्मद्वेषाची (स्वतःविषयीच्या द्वेषाची) काळरात्र संपून आत्मस्वीकृतीचा एक नवा सुवर्णदिन चालू होतो !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !