अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नागपूर – कामराज कॅप्सुल हे आयुर्वेदाचे औषध पडताळणीत निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. कामोत्तेजना वाढवण्यासाठी बोगस औषधाची सर्रासपणे विक्री होत होती. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
औषधाच्या बाहेरील खोक्यावरील बॅच क्रमांक, औषध बनवल्याचा दिनांक आणि मुदत संपण्याचा दिनांक, तसेच प्रत्यक्ष गोळ्यांच्या पाकिटावरील माहिती यांमध्ये मोठी तफावत आढळली होती. या कॅप्सुलमध्ये लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी वापरले जाणारे ‘टँडालाफिल’ (४०.८३ मिलीग्रॅम प्रति कॅप्सुल) हे ॲलोपॅथिक औषध बेकायदेशीरपणे मिसळण्यात आले होते. ‘टँडालाफिल’मुळे हृदयविकार संभवतो.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा