आम्ही (भारत) अमेरिका आणि युरोप यांना ऐकत नाही, मग तुम्ही कोण ?

‘एम्.आय.एम्.’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना वाटते की, भारत आखाती प्रदेशाविना जगू शकत नाही; कारण ते ९० टक्के तेल भारतात पाठवतात. त्यांना वाटते की, आखाती प्रदेश भारताला बोटावर फिरवत आहे. प्रत्यक्षात तसे नाही; पण परिस्थिती उलट आहे. मी तुम्हाला सांगेन की, तुम्ही प्रथम भारतीय असल्याचा अभिमान का बाळगावा ?

१. कोणते आखाती प्रदेश भारताकडून काय काय मागवतात ?

अ. कतार : कतारमध्ये जवळपास ६ सहस्र भारतीय आस्थापने कार्यरत आहेत आणि कतारला माहिती-तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, ऊर्जा इत्यादींमध्ये साहाय्य करत आहेत. एकूण २७ लाख लोकसंख्येपैकी ७ लाख भारतीय कतारमध्ये रहातात. कतारच्या अर्थव्यवस्थेत भारतियांचा वाटा मोठा आहे.

भारतीय आस्थापनाने ‘फिफा’ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या. कतार भारतातून १ लाख मेट्रिक टन गहू आणि १ लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ आयात करतो, जे त्यांच्या वापराच्या जवळपास ५० टक्के आहे. याखेरीज २५ सहस्र मेट्रिक टन भाजीपाला मागवतो.

महंत श्री सुधीरदासजी महाराज

आ. कुवेत : एकूण ४७ लाख लोकसंख्येपैकी १० लाख भारतीय आहेत. साडेपाच लाख भारतीय सनदी लेखापाल, अभियंता, डॉक्टर, परिचारिका इत्यादी म्हणून काम करत आहेत. २८ सहस्र भारतीय कुवेत सरकारमध्ये काम करत आहेत आणि वित्त, वैद्यकीय, संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) अन् अवकाश संशोधन यांत योगदान देत आहेत.

इ. सौदी अरेबिया : ७४५ भारतीय आस्थापने सौदीतून काम करतात. २२ लाख भारतीय जे सौदीला ‘टेक ॲडव्हान्स’ (तंत्रज्ञानातील विकास) रहाण्यासाठी साहाय्य करत आहेत. ते साडेसहा लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ आयात करतात, जे एकूण वापराच्या ५० टक्के आणि १६ सहस्र मेट्रिक टन भाजीपाला आहे. फळे, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ अतिरिक्त आहेत. ते भारतातून दीड लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ आणि १७ सहस्र मेट्रिक टन भाजीपाला आयात करतात. गहू आणि दुग्धजन्य पदार्थ अतिरिक्त. इतर सर्व अरब जगासाठी केसासमान आहे.

ई. इराण : भारताकडून १० लाख टन बासमती तांदूळ घेतो, जो त्यांच्या एकूण वापराच्या ४० टक्के आहे. १.७ लाख मेट्रिक टन फळे.

२. भारताने धान्यपुरवठा केला नाही, तर आखाती प्रदेश टिकेल का ?

आता सांगा कोण कुणाविना जगू शकत नाही ? आखाती प्रदेश नसल्यास आमची उत्पादने इतरत्र कुठेही खरेदीदार शोधतील; पण ते काय खाणार ? तेल ? भारत रशियाकडून तेल आयात करू शकतो. आम्ही आधीच रशियाकडून ८८ दशलक्ष बॅरल तेल आयात केले आहे आणि शक्यतो रशिया या वर्षाच्या अखेरीस भारताच्या एकूण तेलाच्या ३० टक्के गरजांची पूर्तता करील; पण भारताविना आखाती प्रदेश कसा टिकेल ? टिकू शकले असते, तर  पूर्वीपासून पर्याय शोधला असता. मेक्सिको आणि रशिया येथून पेट्रोल मिळेल; पण आखाती देशातील लोक भारताप्रमाणे मेंदू कसा निर्माण करणार ? तेल मेंदू निर्माण करत नाही. पैशाने कुशल कामगार निर्माण होत नाहीत. अर्धे अरब जग बासमती तांदूळ शोधत असेल, ज्याचे उत्पादन केवळ भारतातच होते. ते बिर्याणी कशी शिजवतील ? त्यामुळे ‘अरब वर्ल्ड इज आर्म ट्विस्टिंग इंडिया’ (अरब देश भारतावर दबाव आणत आहेत), अशी अतार्किक टिप्पणी करण्यापूर्वी पुन्हा विचार करा.

भारत अरब जगासाठी जे काही करत आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे टिप्पणी करण्यापूर्वी पुन्हा विचार करा. आम्ही अमेरिका आणि युरोप यांना ऐकत नाही, मग तुम्ही कोण ?

– महंत सुधीरदास महाराज, काळाराम मंदिर, नाशिक. (१२.६.२०२६)