‘जॉब फेअर २०२६’ या रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पणजी, १४ जून (वार्ता.) – खासगी क्षेत्रात काम करणार्या महिलांसाठी बसभाड्यात सवलत दिली जाणार आहे आणि या अंतर्गत कदंब वाहतूक महामंडळ अन् ‘माझी बस’ योजना यांच्या अंतर्गत येणार्या बसगाड्यांच्या भाड्यात ही सवलत दिली जाणार आहे. सरकार पुढील २-३ मासांमध्ये विविध उपक्रम चालू करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. सांताक्रूझ येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात आयोजित केलेल्या ‘जॉब फेअर २०२६’ या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. याप्रसंगी रोजगार आणि कामगार खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात आणि खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी पुढील आवाहन केले.
युवायुवती यांनी नवीन कौशल्य सतत आत्मसात करावे !
तरुणांनी केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून राहू नये. आजच्या ‘डिजिटल’ आणि ‘कृत्रिम बद्धीमत्ता’ (एआय) यांवर आधारित जगात कौशल्ये वेगाने पालटत आहेत. ‘एआय’मुळे काहींच्या नोकर्या जाऊ शकतात, तरीही जे लोक तंत्रज्ञान आत्मसात करतील आणि त्यानुसार स्वत:ला जुळवून घेतील, त्यांच्यासाठी यामुळे नवीन संधीही उपलब्ध होणार आहे. यासाठी युवावर्गाने त्यांची कौशल्ये सतत अद्ययावत करणे आणि भविष्यातील संधी यांच्यासाठी सज्ज रहाणे आवश्यक आहे.
खासगी आस्थापनांमध्ये किती गोमंतकियांना नोकर्या मिळाल्या, याचा आढावा घेणे चालू !
कामगार आणि रोजगार विभागाच्या वतीने चालवल्या जाणार्या ‘प्लेसमेंट सेंटर’ने आजवर ८०० हून अधिक उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यास साहाय्य केले आहे.
खासगी आस्थापनांमध्ये किती गोमंतकियांना नोकर्या मिळाल्या?, याचा आढावा कामगार खाते निरीक्षकांच्या माध्यमातून घेत आहे. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने केंद्रीय आणि राज्य सरकार यांमधील कर्मचार्यांना वेतन वाढ मिळते, त्याच पद्धतीने खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांना देखील ती मिळावी, यासाठी गोवा सरकार प्रयत्नरत आहे. तरुणांनी खासगी क्षेत्रातील संधींचाही लाभ घ्यावा.
रोजगार मेळाव्यामध्ये १५० हून अधिक आस्थापनांचा सहभाग
रोजगार मेळाव्यामध्ये १५० हून अधिक आस्थापनांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विमानवाहतूक (एव्हिएशन), आरोग्य सेवा, किरकोळ व्यापार (रिटेल), आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), उत्पादन, ऑटोमोबाईल्स, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, बँकिंग, वित्तीय सेवा, इलेक्ट्रॉनिक्स आणि ई-कॉमर्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये ५ सहस्रांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी १० सहस्रांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली होती, तर दुपारपर्यंत मेळाव्याला अनुमाने १ सहस्र ५०० तरुणांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मेळाव्यात सहभागी आस्थापनांना ‘नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मार्गदर्शन आणि आवश्यक सल्ला द्यावा’, असे आवाहन केले.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !