पोलीस ठाण्यातून पळालेला आरोपी अटकेत; गुन्हा नोंद !

नवीन पनवेल – कामोठे पोलीस ठाण्यातील शौचालयाच्या खिडकीतून पळून गेलेला आरोपी चेतन कातकर याला पोलिसांनी काही घंट्यांत अटक केली. त्याने शौचालयात जाण्याचे कारण देत तेथील खिडकीतून पलायन केले. पोलीस कोठडीतून पळून गेल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

आरोपीवर पोलिसांचे नियंत्रण कसे नाही ? अशा निष्काळजी पोलिसांनाही बडतर्फ करायला हवे !