केडगाव गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरण
३ आधुनिक वैद्यांसह ५ जणांवर गुन्हा नोंद, २ जण पसार

केडगाव (पुणे) – येथील विनाअनुमती गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात यवत पोलिसांनी अजून २ आधुनिक वैद्यांना अटक केली. आधुनिक वैद्या स्वाती लवंगारे, तुकाराम मोटे अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी दिली. वैद्यकीय अधीक्षक सचिन गुजर यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
१. आधुनिक वैद्या स्वाती लवंगारे यांचे केडगाव येथे ‘लवंगारे मॅटिर्निटी होम’ नावाचे रुग्णालय आहे. तुकाराम मोटे यांचे उरुळी कांचन येथे ‘माहेर’ नावाचे रुग्णालय आहे.
२. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी ‘या प्रकरणातील संबंधितांना ‘मकोका’ लावावा’, असे वक्तव्य केले होते.
३. जिल्हा शल्यचिकित्सक नागनाथ एमपल्ले यांनी दौंड तालुक्यातील विविध रुग्णालयांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर