‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त सातारा येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन

सातारा – ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त सातारा शहरात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शिवतीर्थ परिसरातील शिवरायांच्या पूर्णाकृती मूर्तीला खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत. न्याय, समता, शौर्य आणि स्वाभिमान या मूल्यांवर उभे असलेले शिवरायांचे राज्यकारभाराचे तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे. शिवरायांचा इतिहास हा केवळ अभिमानाचा विषय नसून तो आजच्या पिढीसाठी ‘प्रेरणास्त्रोत’ आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने समस्त शिवभक्तांनी शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे स्मरण करायला हवे.’’