व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण काय ?’ (१५.७.२०२२)

१. त्वचेशी संबंधित कायेश्वरीदेवीचे कार्य 

श्री. राम होनप

‘कायेश्वरीदेवी’ ही भगवान शिवाची शक्ती मानली जाते. ‘व्यक्तीच्या त्वचेची ‘निर्मिती करणे, पोषण करणे, तिच्या रंगाची निर्मिती करणे आणि तिचे रक्षण करणे’, ही कार्ये कायेश्वरीदेवी करत असते. कायेश्वरी शक्ती व्यक्तीच्या शरिरातील प्रामुख्याने ‘त्रिगुण, तसेच पृथ्वी, आप आणि तेज ही पंचतत्त्वातील तत्त्वे’, यांद्वारे त्वचेचे कार्य करत असते.

२. व्यक्तीच्या शरिरात कायेश्वरी शक्तीचे स्थान 

व्यक्तीच्या मूलाधारचक्रात जीवनशक्तीचा वास असतो. तेथे कायेश्वरी शक्तीचे स्थान असते. व्यक्तीतील जीवनशक्तीद्वारे तिच्या शरिरात असंख्य सूक्ष्म ऊर्जाप्रवाह निर्माण होतात. त्यांच्यामुळे शरिराच्या प्रत्येक घटकाला कार्य करण्याची शक्ती मिळते. जीवनशक्तीतील कायेश्वरी शक्तीद्वारे व्यक्तीच्या शरिरात त्वचेशी संबंधित पेशी आणि सूक्ष्म ऊर्जाप्रवाह निर्माण होतात.

३. व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण 

कायेश्वरी शक्तीतील ‘पृथ्वीतत्त्वामुळे त्वचेचे थर आणि रंग निर्माण होणे, आपतत्त्वामुळे त्वचेचा रंग टिकून रहाणे अन् तेजतत्त्वामुळे त्वचेच्या रंगात विविध छटा निर्माण होणे’, ही कार्ये घडतात. कायेश्वरी शक्ती व्यक्तीच्या डाव्या बाजूची चंद्रनाडी (शीतल) आणि उजव्या बाजूची सूर्यनाडी (उष्ण) यांद्वारे कार्य करत असते. कायेश्वरी शक्तीचे त्वचेशी संबंधित कार्य करण्याचे स्वरूप चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांच्या अनुक्रमे शीतल अन् उष्ण या गुणधर्मांमुळे पालटते. परिणामी व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता दिसून येते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ६.१.२०२६, वेळ : सकाळी ११.३८ आणि कालावधी : ३० सेकंद)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.