
कोल्हापूर – ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या प्रशासकाचा कार्यकाळ ६ एप्रिलला संपुष्टात आला. यानंतर २ महिने पद रिक्त होते. समितीच्या वतीने व्यवस्थापित विविध न्यासांचे दैनंदिन प्रशासकीय, आर्थिक, तसेच न्यायप्रविष्ट कामकाज अखंडित चालू रहाणे आवश्यक आहे. प्रशासकपद रिक्त राहिल्यास कामकाजावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. समितीची पुनर्रचना होईपर्यंत संबंधित न्यासांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे संरक्षण, संवर्धन अन् व्यवस्थापन अबाधित रहावे, यांसाठी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकार्यांची ही नियुक्ती समितीची पुनर्रचना होईपर्यंत अथवा शासनाच्या पुढील आदेशापर्यंत कायम रहाणार असून सदर आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज