१ सहस्र पोलीस होते तैनात
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे २ जूनच्या मध्यरात्री प्रशासनाने बुलडोझरद्वारे ‘अजगैब शहीद मशीद’ पाडली. अवघ्या २२ मिनिटांत ५ बुलडोझरने ४२ फूट उंच मशीद भुईसपाट करण्यात आली. सर्व ढिगाराही रात्रीच्या अंधारातच ट्रकमध्ये भरून हटवण्यात आला. या वेळी १ सहस्रांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. ही मशीद २०० वर्षे जुनी होती, असा दावा करण्यात येत असतांना स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही मशीद गेल्या काही दशकांत बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
🏛️ Authorities in Kashi demolished a mosque built on railway land following a court order !
🚨👮♂️ Around 1,000 police personnel were deployed !
😲 The scale of deployment required to remove an unauthorised mosque indicates who is responsible for violence in the country 🔥
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 3, 2026
प्रशासनाचे म्हणणे आहे की, मशीद रेल्वेच्या भूमीवर बांधली होती. प्रकरण न्यायालयात गेले होते, तेथून निकाल रेल्वेच्या बाजूने लागला. रेल्वेने भूमी रिकामी करण्यासाठी ३ वेळा नोटीस बजावली; परंतु भूमी रिकामी केली गेली नाही. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (यातून देशात कायद्याचे पालन कोण करत नाहीत, हे लक्षात येते ! अशांना भारतातून हाकलून लावणेच हाच आता कायमस्वरूपी उपाय शिल्लक राहिला आहे ! – संपादक) येथे काशी रेल्वे स्थानकाचा विस्तार केला जात आहे. याच कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. (याचा अर्थ विस्तारकार्याचे प्रयोजन नसते, तर अनधिकृत मशिदीला तसेच उभे राहू दिले असते का ? ही स्थिती प्रशासकीय हलगर्जीपणाचाच भाग आहे, असे म्हटले पाहिजे ! – संपादक)

महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !