‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण

बीड – देशभरात गाजलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणातील आरोपी प्रा. पी.व्ही. कुलकर्णी यांच्या बीड शहरातील शाहूनगर परिसरातील ४ मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर नगरपालिका प्रशासनाने कारवाई चालू केली आहे. ‘संबंधित बांधकाम स्वतः पाडून घ्यावे’, अशी नोटीस प्रशासनाकडून देण्यात आली होती. नोटिशीची मुदत संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून पाडकाम चालू करण्यात आले.
या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) महाराष्ट्रातील लातूर, पुणे, नाशिक आणि बीड येथून अनेकांना अटक केली आहे. प्रा. पी.व्ही. कुलकर्णी आणि प्रा. शिवराज मोटेगावकर यांना न्यायालयाने १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अन्वेषणात काही धक्कादायक माहिती समोर आली असून ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क घेतले जात असल्याचे उघड झाले आहे, तसेच आरोपी कुलकर्णी, मोटेगावकर आणि इतर संबंधितांमधील संबंधांचे सीबीआयकडून पुढील अन्वेषण चालू आहे.
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !